उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यु होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उष्णतेच्या लाटेची माहिती देण्याकरिता रेडिओ, टि.व्ही., सोशल मिडीया व स्थानिक वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांना सूचित करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष/ महानगरपालिका नियंत्रण कक्ष/ विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष आणि स्थानिक संस्था आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रित कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संबंधित विभाग, स्थानिक पुढारी व सामाजिक संस्था यांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी
१ तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.

२. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

३. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलाचा वापर करण्यात यावा.

४. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

५. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.

6. शरीरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा.

7. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

८. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.

९. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.

१०.पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

११. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

१२. सूर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.

१३. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.

१४. बाहेर कामकाज करीत असताना अधूनमधून विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

१५. गरोदर, कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

१६. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.

१७. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावा.

 

काय करू नये :-

१. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.

२. दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

3. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

४. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी १२.०० ते ०३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.

५. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading