उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी हवा तेवढा निधी देणार – मुख्यमंत्री

उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी हवा तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन उल्हास ई चार्जिंग केंद्र, श्वान निर्बिजीकरण केंद्र, दिव्यांगासाठी संगणक प्रणाली, प्लॅस्टिक क्रशिंग मशीन या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत केली जाईल. रस्ते, पाणी, दिवाबत्ती आणि शहराची स्वच्छता यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. कारण आता तुमचा हक्काचा मुख्यमंत्री आलेला आहे. उल्हासनगरमधील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी सगळे अडथळे दूर करण्यासाठी नियमांमध्ये देखील बदल केला आहे. त्याचा शासन निर्णय लवकरच प्राप्त होईल. उल्हासनगर शहराला 50 एम एल डी पाण्याची आवश्यकता आहे, ही पाण्याची कमतरता देखील राज्य शासन पूर्ण करेल. मोठे रस्ते, पिण्यासाठी पाणी, दिवाबत्ती, गार्डन या मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम महापालिका आणि राज्य सरकार दोन्हीच्या माध्यमातून करत आहे. यामुळे उल्हासनगरातील रहिवाशांचे जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading