उल्हासनगर जवळील शहाड सेंचुरी रेऑन कंपनीत स्फोट;दोन जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी

उल्हासनगरच्या शहाड जवळील सेंचुरी रेयॉन कंपनीत भीषण स्फोट झाला आहे.या प्रकरणी दोन जणांचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.स्थानिक पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास उल्हासनगर, मुरबाड हायवे जवळ, शहाड या ठिकाणी सेंचुरी रेयोन या कंपनीमध्ये MH ४६ BB ४९७५ या नायट्रोजन कंटेनरचा स्फोट झाला होता. सदर घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान व सेंचुरी रेयोन कंपनीचे १ फायर वाहन उपस्थित होते. सदर घटनेमध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला असून ८ व्यक्तींना दुखापत झाली आहे त्यांना उपचार करण्यासाठी फोर्टिस रुग्णालय, कल्याण सेंचुरी रेयोन या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल केले आहे.

दुखापत झालेल्या व्यक्तीचा तपशील पुढीलप्रमाणे:-

श्री. सागर झालटे. (पु/ वय ४४ वर्षे) सेंचुरी रेयोन कंपनी कर्मचारी. पंडित मोरे वाहन चालक श्री. प्रकाश निकम (पु/ वय ३४ वर्षे) सेंचुरी रेयोन कंपनी कर्मचारी. श्री. हंसराज सरोज (पु/ वय ५२ वर्षे, ड्रायव्हर बरोबर मदतनीस) सदर घटनेत श्री. शैलेश यादव(पु/२५ वर्ष, सेंचुरी रेयोन कंपनी कर्मचारी) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मुर्त्यू झाला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading