महापालिकाक्षेत्रात १६८३० श्रीगणेशमूर्तींचे तसेच १००६ गौरीमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन

श्रीसह गौरी विसर्जनाच्या पाचव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १६८३० गणेश मूर्ती तसेच १००६ गौरी मूर्ती अशा एकूण १७८३६ मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यात १७१ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे व गौरी मूर्तींचे विसर्जन केले.

महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. प्रत्यक्ष विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह अतिरीक्त आयुक्त (१) श्री. संदीप माळवी आणि अतिरीक्त आयुक्त (२) श्री. प्रशांत रोडे यांनी पाहणी केली. तसेच, गणेश भक्तांचे सहकार्याबद्दल आभारही मानले.

भाविकांनी ४४८ मूर्ती स्वीकार केंद्रात दिल्या

महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ४४८ गणेश मूर्तींचे महापालिकेच्यावतीने पारसिक रेतीबंदर घाट येथे विधिवत विसर्जन करण्यात आले. *१५ टनाहून अधिक निर्माल्‍य भक्‍तांनी केले दान* ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्‍यासपीठ गेली १२ वर्षे गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍य व्‍यवस्‍थापन करीत आहे. त्यात रोटरी क्‍लब ऑफ ठाणे गार्डन सिटी तसेच प्रकल्‍प पुर्ननिर्माणचे सदस्‍य मदत करतात. पाच दिवसाच्‍या गणेश मूर्ती व गौरी मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १५ टनाहून अधिक निर्माल्‍य संकलित झाले आहे. या निर्माल्‍यावर प्रक्रिया करून त्‍याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी सुमारे १० टन निर्माल्य संकलन झाले होते. विशेष म्हणजे प्लास्टिकचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.

विर्सजनाची आकडेवारी

(विर्सजन स्थळ (संख्या) – गणेश मूर्तींची संख्या)

कृत्रिम तलाव (१५) – ११५३६
विसर्जन घाट (०७) – ४७९३
विशेष टाकी व्यवस्था (४२) – १५०७
एकूण – १७८३६

—-+++———-

एकूण गणेश मूर्ती १६८३०
एकूण गौरी मूर्ती १००६
सार्वजनिक गणेश मूर्ती १७१
मूर्ती स्वीकार केंद्र ४४८

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading