उद्या छटपूजा असून त्याचं महत्व काय याची माहिती

उद्या छटपूजा असून हा सण आपल्याकडे कसा परिचित झाला आणि या सणाचं महत्व काय असतं याची माहिती पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी दिली.

पूर्वी कदाचित ‘ छटपूजा ‘ हा शब्दही तुम्ही ऐकला नसेल. पण बिहार-उत्तर भारतातून अनेक लोक नोकरी-धंद्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले आणि त्यांच्याबरोबर ही छटपूजाही येथे आली.त्यामुळे ती आपल्या परिचयाची झाली.
कार्तिक शुक्ल चतुर्थी पासून कार्तिक शुक्ल सप्तमी पर्यंत हे व्रत केले जाते. कार्तिक शुक्ल षष्ठी हा दिवस प्रमुख असतो. षष्ठी ही ब्रह्मदेवाची मानसकन्या ! ही सूर्याचे बहीण मानली जाते. हिला ‘ षष्ठी मैया’ म्हणूनही ओळखले जाते. षटपूजा व्रतामध्ये सूर्य आणि षष्ठी मैया यांची पूजा करतात. सूर्याला अर्घ्य देतात,म्हणून ही पूजा सागर, नदी, तलाव किनारी करतात. संतान प्राप्तीसाठी आणि मुलांचे आरोग्य चांगले रहावे. अपमृत्यू होऊ नये म्हणून महिला हे व्रत करतात.
शेवटी तात्पर्य एकच ! की लोकांनी फलाच्या आशेने का होईना, निसर्गपूजा करावी. निसर्गाप्रती कतज्ञता व्यक्त करावी. ठाण्यातील उपवन तलाव येथेही आज छटपूजेची तयारी केली जात होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading