राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना

राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना आज सकाळी घडली.आज सकाळी १० च्या सुमारास ठाण्यातून भिवंडीला जाणारी बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्कीट होऊन अचानक आग लागली. या बसमध्ये ७० प्रवासी होते. परंतु आग लागल्याचं समजताच बस चालक आनंद सवारे आणि वाहक गणपत बिराजदार तसंच स्थानिक नागरिकांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. वेळीच ही बाब लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading