भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित 14 ऑगस्टला होणार 10 कि.मी ची मॅरेथॉन आणि वर्षा सायक्लोथॉन सायकल रॅली स्पर्धा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने 14 ऑगस्ट रोजी 10 कि.मीची मॅरेथॉन स्पर्धा आणि वर्षा सायक्लोथॉन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा ठाणे महापालिका भवन येथून सुरू होवून त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. या मॅरेथॉन आणि सायक्लोथॉन स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच याचवेळी ठाणे पोलीसांची मॅरेथॉन सुद्धा महापालिका भवन येथून सुरू होवून याच ठिकाणी समाप्त होणार आहे. मॅरेथॉन या स्पर्धेतील पुरूष आणि महिला या दोन्ही गटातील विजेत्या प्रथम क्रमांकास रुपये 15 हजार, द्वितीय 12 हजार, तृतीय 10 हजार, चतुर्थ 7 हजार पाचवे 5 हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर यांच्याशी 9820497937 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर वर्षा सायक्लोथॉन सायकल रॅलीची सुरुवात कचराळी तलाव येथून सुरू होवून दादा कोंडके ॲम्पीथिएटर येथे समाप्त होणार आहे. सायकल रॅलीसंदर्भात अधिक माहितीसंदर्भात चिराग शहा यांचेशी 9664231220 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading