ठाण्यात आज अखेर सकाळी पावसानं हजेरी लावली. गेले काही दिवस तीव्र उष्म्याने त्रस्त झालेल्या ठाणेकरांना आज सकाळी थोडावेळ झालेल्या पावसाने काही वेळ सुखद गारवा अनुभवता आला. ठाण्यात जून महिना संपत आला तरी पावसाला सुरूवात झालेली नाही. आज सकाळी साधारण अर्धा तास रिमझिम पाऊस सुरू होता. आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं.