आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने डीजी ठाणेचे विशेष कौतुक

इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ‘डिजीठाणे’ या भारतातील पहिल्या डिजीटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने डीजी ठाणेचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. ‘स्कॉच’ या संस्थेकडून दरवर्षी पर्यावरण ,स्मार्ट सिटी आणि इतर विविध क्षेत्रात उल्लेंखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला जातो. स्कॉच राष्ट्रीय पुरस्काराने स्मार्ट सिटीच्या डीजी ठाणे या विशेष प्रकल्पाला सुवर्ण पुरस्कार दिल्याबद्दल भारत सरकारच्या आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाच्यावतीने स्मार्ट सिटीचे संचालक राहुल कपूर यांनी विशेष कौतुक केले आहे. डीजी ठाणे या डिजीटल प्रणालीच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी,ज्येष्ट नागरिक, युवावर्ग यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. डिजिटल युगात ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनाच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या ठाणे महापलिकेच्या स्मार्टसिटीच्या कार्याचे भारत सरकारकडून कौतुक करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading