आर.टी.ई. प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या बालकांचे १५ सप्टेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करण्याचं शिक्षणाधिका-यांचं आवाहन

आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी केले आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेजद्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि ई-मेलद्वारे बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तातपुरता प्रवेश निश्चित करावा. वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ 1 ली ते 8वी पर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी शासनाने या घटकातील बालकांसाठी 1लीच्या मंजूर जागांच्या 25% प्रवेश हे त्या त्या शाळांच्या प्रथम प्रवेशस्तरावर करावयाचे आहेत. ठाणे जिल्हयातील पाच तालुके आणि सहा महापालिकांतील आर.टी.ई. 25% प्रवेशासाठी मार्चमध्ये लॉटरीद्वारा निवड प्रक्रीया पुर्ण करण्यात आली असुन ९३२६ अर्जांची निवड झाली आहे. शाळांनी शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे
a) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.

प्रतीक्षा यादी (Waiting List ) मधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये .त्यांच्या करिता स्वतंत्र सूचना आर.टी.ई.पोर्टलवर नंतर दिल्या जातील .

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading