आज ४ बांधकामे आणि १०५ हातगाड्यांवर कारवाई

अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांविरोधात केलेल्या कारवाईमध्ये आज एकूण चार बांधकामे जमीनदोस्त करण्याबरोबरच १०५ हातगाड्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. कालपासून ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. आज या कारवाईमध्ये दिवा प्रभाग समितीतंर्गत दोन आरसीसी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली तर माजिवडा –मानपाडा प्रभाग समितीतंर्गत एक आणि कळवा प्रभाग समितीतंर्गत एक आरसीसी बांधकाम तोडण्यात आले. दरम्यान आज प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये संपूर्ण शहरामध्ये एकूण १०५ हातगाड्या तोडण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading