आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या प्रतीक्षा यादीनुसार निवड झालेल्या बालकांना २८ जून पर्यंत प्रवेश घेता येणार

आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या प्रतीक्षा यादीनुसार निवड झालेल्या बालकांना २८ जून पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी दिली. वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील पहिली ते आठवी पर्यंतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते . या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत २०२२-२३ साठी जिल्हयातील पाच तालुके आणि सहा महापालिका कार्यक्षेत्रात आर.टी.ई. २५ % प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीमधील टप्पा क्र.२ मध्ये जिल्ह्यातील एकूण ७१० अर्जांची निवड झाली आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश घेण्याकरता पालकांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा ,तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती आणि कागदपत्रे शाळेत जमा करून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना मोबाईलवर एस. एम. एस प्राप्त झाले असतील, परंतु फक्त एस. एम. एस वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याच्या निवडीबाबत खात्री करून घ्यावी. प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading