आरक्षण सोडतीमध्ये फारसा धक्का न बसल्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये आनंदीआनंद

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये फारसा धक्का न बसल्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण आहे. ठाणे महापालिकेच्या सभागृहात १४२ नगरसेवक राहणार आहेत. या १४२ जागांसाठी काल आरक्षणं काढण्यात आली. यासाठी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये विद्यमान नगरसेवकांना फारसा धक्का न बसल्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण आहे. आरक्षणानंतर काही प्रभागांमध्ये प्रस्थापितांना संधी मिळणार आहे तर काही प्रभागांमध्ये तडजोड करावी लागणार आहे. दिव्यामध्ये शिवसेनेला आरक्षणात झुकतं माप मिळालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading