आयुष्मान भारत योजनेतून ३ कोटी रुग्णांवर उपचार

मोदी सरकारने गोरगरीब, वंचितांसाठी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेतून आजवर देशभरात ३ कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी१८ कोटींपेक्षा अधिक लोकांना आयुष्मान कार्ड चे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. स्वस्त दरात औषधे पुरविण्याच्या उद्देशाने देशभरात  ८ हजार ६९४ पंतप्रधान जनऔषधी केंद्रे सुरु करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोरगरीब, वंचित वर्गातील जनतेला अनेक आजारांवरील महागडे उपचार परवडत नाहीत हे ओळखून मोदी सरकारने सप्टेम्बर २०१८ मध्ये आयुष्मान भारत योजनेचा प्रारंभ केला. या योजनेत खासगी आणि सरकारी रुग्णालयांत ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या योजनेत सरकारी आणि खासगी मिळून २७ हजार ३०० रुग्णालये सहभागी झालीआहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशनसाठी मोदी सरकारने सोळाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे.   या योजनेत देशभरातील १०. ७४ कोटींपेक्षा अधिक गोरगरीब , वंचितकुटुंबांना म्हणजे ५० कोटी लोकांना मोफत उपचाराची सुविधा देणे हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेची माहिती मिळवण्यासाठी mera.pmjay.gov.in नावाचेसंकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. देशातील आरोग्य सेवा आणि सुविधा परिपूर्ण बनविण्यासाठी मोदी सरकारने ‘आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन’सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ६५ हजार कोटी रुपये खर्चून देशभरातीलआरोग्य केंद्रात अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हापातळीवरील सरकारी रुग्णालयात आयसीयु, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन या सुविधांसह ३७ हजारबेड उपलब्ध केले जाणार आहेत. या बरोबरच ब्लॉक पातळीवर ४ हजार पेक्षा अधिकसार्वजनिक आरोग्य केंद्रे तसेच प्रयोगशाळा सुरु केल्या जाणार आहेत. मोदी सरकारने सिरींज, डिजिटल थर्मामीटर, स्टेंट , डायलिसिस मशीन या सारख्या उपकरणांना औषधांच्या श्रेणीत आणल्यामुळे या उपकरणांच्या किंमती नियंत्रणात आल्या आहेत. मोदी सरकारने कॅन्सर, टीबी, मधुमेह यासारख्या दुर्धर आजारावरील ८०० औषधे कमी किमतीत उपलब्ध करून दिली आहेत. स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची संख्या ८ हजार ६९४ पर्यंत पोहचली असल्याचंही सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading