आमदार संजय केळकर यांच्याकडून पत्रकार कक्षामध्ये आणखी दोन संगणक

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पत्रकार कक्षामध्ये आणखी दोन संगणक दिले आहेत. ठाणे महापालिकेमध्ये पत्रकार कक्ष असून या कक्षामध्ये यापूर्वीही दोन संगणक आमदार संजय केळकर यांनी दिले होते. आता आज पुन्हा त्यांनी दोन संगणक दिले आहेत. यामुळे पत्रकारांना त्यांचे वृत्तांकन लवकर पाठवण्यासाठी या संगणकांचा फायदा होणार आहे. सध्या पत्रकारांची संख्या वाढली असल्यामुळे पूर्वीचे दोन संगणक कमी पडत होते. आता या नव्याने देण्यात आलेल्या दोन संगणकांचा फायदा पत्रकारांना बातम्या वेगानं पाठवण्यासाठी होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading