आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामावर गेल्या ८ वर्षात कारवाई न झाल्याचा किरिट सोमैय्यांचा आरोप

विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या दोन इमारती अनधिकृत असून अनधिकृत मजले तोडण्याच्या आदेशांवर गेल्या ८ वर्षात कारवाई झाली नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांनी केला आहे. आज एका पत्रकार परिषदेत सोमैय्या यांनी महापालिकेकडून मिळालेल्या माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरावरून हा आरोप केला आहे. विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सनं बांधलेल्या इमारत ए साठी वापर परवाना आहे पण बी-१, बी-२ या १३ मजली इमारतीसाठी कोणताही वापर परवाना देण्यात आला नसल्याचा सोमैय्या यांचा आरोप आहे. या इमारतीमधील सदनिकांची विक्री करून मध्यमवर्गीय ग्राहकांची त्यांनी फसवणूक केली आहे. या फसवणुकीच्या विरोधात आमदार प्रताप सरनाईक आणि विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सच्या विरोधात कारवाईची मागणी किरिट सोमैय्या यांनी केली आहे. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश २०१२ मध्ये देण्यात आले होते. मात्र आमदार प्रताप सरनाईक यांनी अपिल केल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. या इमारतीत प्रताप सरनाईक यांचं कार्यालय असून त्यांचे भागीदार अमित चांदोळे हे या इमारतीत बाराव्या आणि तेराव्या मजल्यावर राहत असल्याचा आरोपही किरिट सोमैय्या यांनी यावेळी केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading