आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातर्फे मुंब्रा परिसराला अद्ययावत रुग्णवाहिका

कोरोनाच्या महामारीमध्ये रूग्णांना वेळेत रूग्णालयात जाणे शक्य व्हावे, या उद्देशाने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा परिसराला अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. आज सकाळी या रुग्णवाहिकेचे आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सध्या मुंब्रा परिसर कोरोनामुक्त होत आहे. मात्र पूर्ण धोका टळलेला नाही. त्यामुळे ऑक्सीजनयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिवहन समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान यांच्या इत्तेहाद ट्रस्टच्या माध्यमातून या रुग्णवाहिकेची विनामूल्य सेवा पुरविण्यात येणार आहे. आज लोकार्पण झाल्यानंतर लगेचच ही रुग्णवाहिका रूग्णसेवेसाठी तैनात करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading