राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई हे आज ठाणे जिल्हा दौऱ्यावर आले. त्यावेळी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले.
पालकमंत्री म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर देसाई हे प्रथमच ठाण्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आले होते. ठाण्यात आगमन झाल्यानंतर त्यांनी दिघे यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.