आदेशानंतरही खाजगी दवाखाने रूग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द करावेत – महापौर नरेश म्हस्के यांचे आदेश

ठाणे शहरातील खाजगी दवाखाने आणि रुग्णालये बंद असल्याने रूग्णांचीगैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

खाजगी दवाखाने रूग्णालये बंद ठेवून रुग्णांची गैरसोय करणाऱ्या डॉक्टरांचे परवानेतात्काळ रद्द करण्यात येतील असे आदेश प्रशासनाने देवून सुध्दा ज्याखाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले नाहीत अशा खाजगी डॉक्टरांचेपरवाने रद्द करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी असे आदेशमहापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिलेआहेत  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र बंदची घोषणा झाल्यानंतरशहरातील सर्व दवाखाने खाजगी रुग्णालय बंद ठेवण्यात आली असूनत्यामुळे सामान्य रुग्णांची गैरसोय होते आहे राज्य शासनाने दिलेल्यासूचनांप्रमाणे खाजगी  दवाखानेरुग्णालये  यांनी आपली सेवा सुरु  ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून साथीचे आजार अन्य छोट्याआजारांसाठी रुग्णांना रुग्णसेवा नेहमीप्रमाणे सहज उपलब्ध होऊ शकतेमात्र खाजगी डॉक्टर रुग्णालयांनी या सूचना पाळलेल्या नाहीत, त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहेएकीकडे कोरोनानियंत्रणात आणण्यासाठी मोठी शासकीय रुग्णालये काम करतअसताना नियमित सर्दी खोकला साथीचे आजार असणाऱ्या रुग्णांचाताण या शासकीय रुग्णालय वर येत आहे. त्यामुळे तातडीने शहरातीलछोटे दवाखाने खाजगी रुग्णालय प्रसूतिगृह या सेवा सुरू कराव्यात असेआदेश देवून सुद्धा अद्याप खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेतआदेश देवूनही जर शहरातील खाजगी दवाखाने, रुग्णालये यांनी आपलीसेवा नियमित सुरू केली नाही अशा दवाखान्यांचे परवाने रद्द करण्याचीकार्यवाही सुरु करावी असे स्पष्ट निर्देश महापौरांनी महापालिकाप्रशासनाला दिले आहेत.दरम्यान सध्याची युद्धजन्य परिस्थिती लक्षातघेता खाजगी दवाखाने, रूग्णालये यांनी आपली सेवा तात्काळ सुरूकरण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने दवाखाने सुरू करावेत असेआवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading