कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकप्रतिनीधी या नात्याने कोरोना विरोधातील लढ्याकरिता खासदार निधीतून ५० लाखांचा निधी

कोरोना विषाणुचा संसर्ग देशात तसेच राज्यातही दिवसेंदिवस वाढतअसून कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित नागरिक राज्यात अनेक ठिकाणीरुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यातील अनेक शहरात कोरोना(COVID19) वायरसचा शिरकाव झाला असून राज्यासह ठाणेजिल्ह्यातही कोरोना बाधित रूग्णांचा तसेच कोरोना बाधित नागरिकांच्यासंपर्कात आलेल्या व्यक्तींना आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाविषाणू (COVID19) विरोधात सक्षमपणे लढताना राज्याचेमा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब जातीने लक्ष देत या विषाणुचाप्रादुर्भाव वाढू नये याकरिता युध्दपातळीवर कार्यरत रहात वेळोवेळीअनेक महत्वपूर्ण उपाय योजना राबवत आहेत, असे कल्याण लोकसभाखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले परंतु अचानक आलेल्या या कोरोना संकटाशी दोन हात करताना राज्यसरकारवर याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार पडत आहे. कोरोनाचीतपासणी करण्याकरिता लागणारे  संरक्षणात्मक किट, N-95 सहविविध प्रकारचे मास्क, थरमल इमेजिंग स्कॅनर अथवा कॅमेरा, इन्फ्रा रेडथरमामिटर यांसारखी अनेक वैद्यकिय उपकरणे आणि साधने याबरोबरचकोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी राज्यभरात संक्रमित व्यक्तिच्यासंपर्कात आलेल्या नागरिकांच्या विलगकरणासाठी करण्यात आलेलीराहण्याची, जेवण आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठीची व्यवस्था यांसहअनेक अनेक बाबीं राज्य सरकार करत असताना याचा सरकारीतिजोरीवर खुप मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. यासाठी हातभारम्हणून खारीचा वाटा उचलत कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांतशिंदे हा निधी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading