करोना प्रतिबंध आणि गरजूंना सोयी सुविधा यासाठी जिल्हा संनिंयत्रण समिती

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना निवारागृह, पाणी, अन्नधान्य तसेच भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा या सुविधास्वायंसेवी संस्थाच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यासाठीजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समितीस्थापन करण्यात आली आहे

जिल्ह्यातील महानगराचे क्षेत्र वगळता अन्य भागासाठी जिल्हाधिकारीस्तरावर तर शहरी भागासाठी महानगरपालिकास्तरावर समिती  असतीलकरोना प्रतिबंध लॉकडाऊन कालावधीत सोयी सुविधाउपलब्ध करून देण्यासाठी सर्व उपाययोजनांचे  नियोजन करणे निर्णयांची अंमलबजावणी  करणे आणि संनियंत्रण ठेवणे यासाठी हीसमिती  काम करेल.जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामकाजपुढीलप्रमाणे राहीलजिल्ह्यातील विविध भागामध्ये विविध घटकातीलजीवनावश्यक  सुविधा ज्यांना मिळालेली नाही असे मजूर, विस्थापित बेघर यांची यादी निश्चित करणे, त्याप्रमाणात अन्न्धान्याची आवश्यकता उपलब्धता याचा तपशील ठरविणे, मदत देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, धर्मादाय संस्था, सहकारी संस्था, तसेच सीएसआरमधूननिधी उपलब्ध करून देणाया खाजगी कंपन्या यांची यादी तयार करणे, शिजवलेले अन्न वितरित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणेगरजूंना तात्पुरती निवारागृहे उपलब्ध करून देणे; शाळा, महाविद्यालये, समाजमंदिर, मंगल कार्यालय इतर निवास योग्य सभागृहे अशी योग्यती ठिकाणे निवडून प्राधान्याने जिल्हयाच्या मुख्यालयी  आणिआवश्यकतेनुसार इतर सर्व ठिकाणी स्थानिक पातळीवर विशेषत: औद्योगिक वसाहतीनजिक तात्पुरत्या राहण्याची सोय करावी. ऊसतोडकामगारांकरिता संबंधित साखर कारखान्यांनी निवारागृहाची व्यवस्थाकरणे आदीसाठी ही समिती काम करेल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading