आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहातील शौचालयाची दुरावस्था

आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहातील शौचालयाची दुरावस्था झाल्यामुळं मुलींना त्या ठिकाणी राहणं मुश्कील झालं आहे. ठाण्याच्या कोपरी परिसरात आदिवासी मुलींचे वसतीगृह असून ते भाडेतत्वावर चालवलं जातं. जवळपास दीड महिना या वसतीगृहातील शौचालयाची दुरावस्था झाल्यामुळं इथे मुलींना राहणंही मुश्कील झालं आहे. या वसतीगृहातत ७५ मुली राहतात. वसतीगृहातील बाथरूम तुंबल्यामुळं सर्वत्र दुर्गंधी पसरली असून डासांचं प्रमाणही वाढलं आहे. याबाबत कोपरी प्रभाग समितीच्या आरोग्य अधिका-यांना दीड महिन्यापूर्वी कळवूनही अद्याप यामध्ये कोणतीच सुधारणा झालेली नाही. या वसतीगृहाच्या वॉर्डननी सांडपाण्याची वाहिनी बदलून देण्याची मागणी करून महिना उलटला तरी त्याकडेही महापालिकेच्या आरोग्य विभागानं लक्ष दिलं नसल्याचं दिसत आहे. अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहामुळे या ठिकाणी कसं रहायचं आणि कुठे जायचं असा प्रश्न वसतीगृहातील ७५ मुलींसमोर निर्माण झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading