आकाश पारकर चमकला

आकाश पारकरचा अष्टपैलू खेळ, त्याला जय बिष्टा आणि परिक्षित वळसंगकरकडून मिळालेल्या तेवढ्याच महत्वपूर्ण साथीमुळे मुंडे स्पोर्ट्सने अनुप्रीत टायगर्स संघाचा दोन धावांनी पराभव करत कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी -२० लीग क्रिकेट स्पर्धेत विजयाचे खाते खोलले.
ओव्हल मैदानात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंडे स्पोर्टसने प्रतिस्पर्ध्यासमोर १९.३ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १३४ धावांचे आव्हान उभे केले. आकाश पारकरने संघाच्या धावसंख्येत ३६ धावांचे योगदान दिले. जय बिष्टाने २२ तर त्याच्यासोबत सलामीला आलेल्या परिक्षित वळसंगकरने ३३ धावा केले. अरुप्रीत टायगर्सच्या पियुष कनोजीयने १७ धावांत २ तर अमल शेख आणि सीमांतने प्रत्येकी एक विकेट मिळवली. पण त्यानंतर विजयाच्या जवळ जाऊन सुद्धा अनुप्रीत टायगर्स संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. अनुप्रीत टायगर्स संघाला सहा विकेट्स गमावून २० षटकात १३२ धावा बनवता आल्या. आकाश पारकरने फलंदाजांना अडचणीत आणताना एका निर्धाव षटकासह १३ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. परिक्षित वळसंगकरने दोन विकेट्स मिळवल्या. पराभुत संघाकडून तुषार चाटेने सर्वाधिक २१ धावा केल्या. तर विनीत गोरीवले आणि अजय सिंघमने प्रत्येकी १२ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – मुंडे स्पोर्ट्स : १९.३ षटकात ४बाद १३४ ( जय बिष्टा २२, आकाश पारकर ३६, परिक्षित वळसंगकर ३३, पियुष कनोजिया ४-१७-२, अमल शेख ३-२२-१, सीमांत ३.३-१४-१) विजयी विरुद्ध अनुप्रीत टायगर्स : २० षटकात ६ बाद १३२ (तुषार चाटे २१, विनीत गोरीवले १२, अजय सिंघम १२, आकाश पारकर ४-१-१३-३, परिक्षित वळसंगकर ४-२३-२). मुंडे स्पोर्ट्स दोन धावांनी विजयी. सामनावीर – आकाश पारकर.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading