प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ते सुरक्षा अभियान आणि जनजागृतीपर चित्ररथाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ठाणे जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाची सुरूवात आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जनजागृतीपर चित्ररथाच्या उद्घाटनाने झाली. या अभियानाअंतर्गत पुढील सात दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा विषयक समुपदेशन, मार्गदर्शन कार्यशाळा, अवजड वाहन चालक आणि रिक्षा चालकांसाठी आरोग्य, डोळे तपासणी शिबिर, विविध टोलनाक्यांवर जनजागृती करणे, मोटार सायकल आणि रिक्षा रॅली आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वाहन चालकांसाठी 7 फेब्रुवारीपर्यंत परिवहन कार्यालयात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मुख आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा विषयक जनजागृती वर्षभर केली जावी. यामध्ये प्रशासनासह जनतेनेही सहभागी व्हावे. अपघाताचे प्रमाण कमी करून आपला प्रवास सुरक्षित होण्यासाठी सर्वांची जनजागृती करण्यासाठी परिवहन विभागाने चित्ररथ तयार केला आहे. अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करत आहोत. यासाठी कार्यप्रणाली तयार केली पाहिजे असं जिल्हाधिका-यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके यांनी वाहनचालकांसाठी तयार केलेल्या रस्ते सुरक्षा विषयक प्रतिज्ञेच्या फलकाचे अनावरण जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading