आईनं आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार

आईनं आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार कळव्यात घडला आहे. कळव्यातील गौरी सुमन सोसायटीमध्ये श्रृती पारकर आपल्या आईसह दुस-या मजल्यावर राहते. श्रृतीचे वडील प्रशांत पारकर काल सकाळी व्यायामशाळेत गेले होते. घरी परत आल्यावर घरात प्रवेश करताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली श्रृती आणि गळफास लावून घेतलेली पत्नी प्रज्ञा यांना पाहून त्यांना धक्काच बसला. या सर्व प्रकाराची माहिती कळवा पोलीसांना देण्यात आली. मात्र प्रज्ञा यांनी श्रृतीची हत्या करत स्वत: आत्महत्या का केली याचं कारण समजू शकलं नाही. मात्र या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading