ठाणे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी पदी डी. वाय. जाधव यांची नियुक्ती झाली आहे. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी अशोक पाटील रूजू झाले आहेत. जाधव हे यापूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तर पाटील हे पालघर जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत म्हणून कार्यरत होते.