केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सनदी अधिकारी घेणार “मॉक इंटरव्यू”

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय “मॉक इंटरव्यू” सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. हा “मॉक इंटरव्यू” सनदी अधिकारी घेणार असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने १६ सप्टेंबरला घेतलेल्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जानेवारी मध्ये मॉक इंटरव्यू सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या “मॉक इंटरव्यू” सत्रात वरिष्ठ सनदी अधिकारी मुलाखत घेणार असून यामध्ये ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, सेवानिवृत्त मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन श्री. के. पी. बक्षी, SPECIAL IG Maharastra State Human Right Commission डॉ. रविंद्र शिसवे, मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ मृदुल निळे, UPSC अभ्यासक्रमाचे तज्ज्ञ मार्गदर्शक भुषण देशमुख यांचा समावेश आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या cdinstitute@thanecity.gov.in या ई-मेलवर आपले DAF-२ अॅप्लीकेशन सादर करावे. तसेच https://forms/gle/X64Enn99MyT9ZYA या लिंकवर 5 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संस्थेच्या 25881421 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन चिंतामणराव प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading