अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जाची सुनावणी आता उद्या होणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती आता उद्या होणार आहे. ही माहिती त्यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी दिली. अविनाश जाधव यांना 31 जुलै रोजी ठाणे खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. तर कोवीड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी रुग्णालयात धावुन गेलेल्या जाधव यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून कापुरबावडी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर जामीनअर्जावर सुनावणी झाल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी या गुन्ह्याबाबत जामीन अर्जावर निर्णय देणे,आपल्या कक्षेबाहेर असल्याचे स्पष्ट करीत जामीन अर्ज फेटाळला होता.
दरम्यान अतिवृष्टीमुळे पोलीसांना अहवाल सादर करता आला नाही त्यामुळे आता उद्या ही सुनावणी होणार असल्याचं राजूरकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading