अल्पवयीन मुलावर 30 वर्षीय नराधमाकडून अतिप्रसंग

ठाण्यातील कळवा परिसरात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलावर 30 वर्षीय नराधमाकडून अतिप्रसंग करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संतापाचे वातावरण आहे. ठाण्यातील सेंट जॉन शाळेतील प्रयोग शाळेत कार्यरत असलेल्या या नराधमावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
६ फेब्रुवारीला संध्याकाळी सुचित खलको याला मद्यपानाच्या नशेत त्याच्याच परिसरातील एका सहा वर्षाच्या मुलाबरोबर अश्लील कृत्य आणि अश्लील वार्ता करताना पकडण्यात आले. या घटनेने संपूर्ण परिसर एकत्रित होऊन त्यांनी पोलीस तक्रार केली आणि नंतर या नराधमाला अटक करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading