अर्चना माळवी यांना मुंबई विद्यापीठाने पीएचडी

गुरूनानक खालसा महाविद्यालय येथील मराठी विभागाच्या अध्यापिका अर्चना माळवी यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाने पीएचडी ही पदवी प्रदान केली. अर्चना माळवी यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख ( निवृत्त) डॉ. भारती निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘१९४५ नंतरच्या निवडक महानगरीय कथांचा चिकित्सक अभ्यास,’या विषयावरील मुंबई विद्यापीठास सादर केलेल्या प्रबंधास ही पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. अर्चना माळवी या गेली २८ वर्षे गुरूनानक खालसा महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे अध्यापन करीत आहेत. त्यांनी आपल्या संशोधनासाठी ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले आणि भाऊ पाध्ये यांच्या निवडक कथांचा चिकित्सक अभ्यास करून प्रबंध मुंबई विद्यापीठास सादर केला होता.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading