दिपीत पाटीलने पटकावले चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद

विद्यमान राज्य विजेता आणि अव्वल मानांकित ठाण्याच्या दिपीत पाटीलने आपला संघ सहकारी आणि दुसरा मानांकित सिद्धेश पांडेंची कडवी लढत मोडीत काढून चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. महिला गटात पुण्याच्या प्रिथा वर्टिकरने मुंबई उपनगरच्या रिशा मिरचंदानीचा पराभव करत अजिंक्यपद मिळवले. पुरुष गटातील अंतिम लढत खूपच रंगतदार ठरली. सातव्या गेमपर्यंत लांबलेल्या सामन्यात दिपीतने ११-१ असा सहज पहिला गेम जिंकून दमदार सुरुवात केली. निर्णायक गेममध्ये मात्र दिपीतने सिद्धेशला ११-६ असे मागे टाकत यंदाच्या मोसमातील दुसऱ्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या अंतिम लढतीत पुण्याच्या १९ वर्षीय प्रिथाने १३ व्या मानांकित मुंबई उपनगरच्या रिशा मिरचंदानीवर …. ७५०० रुपयांचे बक्षीस आपल्या खात्यात जमा केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading