अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती आणि त्यांच्या सहका-यांनी दोन चोरांना दिलं पकडून

अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती आणि त्यांच्या सहका-यांनी दोन चोरांना पकडून पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे. नौपाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चो-यांचं प्रमाण वाढलं आहे. नौपाड्यामध्ये सुशिक्षित वस्ती जास्त असल्यामुळे अनेक घरांमध्ये घरातले नवरा-बायको कामाला गेलेले असतात आणि ज्येष्ठ नागरिक घरी एकटे असतात. चोरटे मंडळी संपूर्ण विभागाचा अभ्यास करून नियोजनबध्द चो-या करत असते. कालही भास्कर कॉलनीतील उड्डाणपूलाजवळील एका स्थानिक विभागातील रहिवाशाला हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील २ सोन्याच्या चेन चोरट्यांनी लुटल्या आणि ते पळून गेले. हे घडताना अभिनय कट्ट्याचे एक सदस्य संभाजी आंग्रे यांनी पाहिले आणि त्यांनी ही माहिती किरण नाकती यांना दिली. किरण नाकती यांनी आदित्य नाकती, शांताराम जाधव, संभाजी आंग्रे, अथर्व नाकती, परेश दळवी यांच्यासह तीन दुचाकीवरून चोरट्यांचा पाठलाग केला आणि ब्राह्मण सोसायटीजवळ या चोरट्यांना पकडलं आणि चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिलं. संभाजी आंग्रे हे प्रत्यक्षदर्शी असल्यानं त्यांनी चोरांची आणि ज्यांना लुटलं अशांची ओळख पटवून दिली. सध्या या सर्वांचं परिसरात कौतुक होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading