अभाविप च्या ५४ व्या कोंकण प्रांताचे ठाण्यात आयोजन

अभाविप च्या ५४ व्या कोंकण प्रांताचे आयोजन ठाणे महानगरात केले असून प्रांतातील सर्व जिल्ह्यातीलसुमारे ७०० विद्यार्थी, विध्यार्थिनी, प्राध्यापक सहभागी होणार आहेत. २७, २८, २९ डिसेंबर २०१९ रोजी ठाण्याच्या डॉ. कशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हे अधिवेशन पार पडणार आहे. ३ दिवस चालणार्या विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि व्यक्तिमत्व विकास ह्या विषयांवर भर देण्याचे ठरविले आहे. २७ डिसेंबर रोजी सकाळी प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात येईल आणि संध्याकाळी अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर तसेच प्रसिद्ध अभिनेते हरीश दुधाडे उपस्थित राहणार आहेत. ह्या वेळी अभाविप राष्ट्रीय संगठन मंत्री आशिष चौहान, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री लक्ष्मण आणि कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ , प्रा मंदार भानुशे यांची उपस्थिती असेल.
ह्या अधिवेशन प्रसंगी २७ डिसेम्बर रोजी प्रदर्शनी अधिवेशन उद्घाटन त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक प्रस्तावांवर चर्चा करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी ‘अभाविप के बढते कदम’ ह्या विषयावर भाषण सत्र होईल . त्याच बरोबर ‘पर्यावरणभिमुख शहरी विकास’ या विषयावर परिसंवाद होईल. भव्य शोभायात्रा आणि खुले अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे .२९ डिसेंबर रोजी ‘समाजपरिवर्तन का केंद्र महाविद्यालय’ या विषयावर भाषण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रांत अधिवेशनाच्य समारोपाला नवीन प्रदेश कार्यकारणीची घोषणा होऊन समारोप करण्यात येईल . यावेळी पत्रकार परिषदेत कोंकण प्रदेश मंत्री श्री अनिकेत ओव्हाळ यांनी हे अधिवेशन शिक्षण क्षेत्रात नवीन दिशा देणारे ठरेल असा आशावाद व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading