डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत चरित्रग्रंथाचे ठाण्यात प्रकाशन

सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष पद्मश्री, आणि पद्मविभुषणने गौरवलेले डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत ‘सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अणुयंत्रिक- डॉ. अनिल काकोडकर ’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन ठाण्यात झाले. अनिता पाटील लिखीत आणि जेष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यानी संपादित केलेला हा ग्रंथ मनोविकास तर्फे प्रकाशित करण्यात आला. आयसीटीचे माजी संचालक डॉ. जेष्ठराज जोशी, जेष्ठ खगोलशास्तज्ञ डॉ. शशीकुमार चित्रे, जेष्ठ वैज्ञानिक एनटीआरओचे माजी अध्यक्ष जेष्ठ वैज्ञानिक आल्हाद आपटे मनोविकास प्रकाशन संस्थेचे संचालक अरविंद पाटकर आणि व्यवस्थापकीय संचालक आशीष पाटकर आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading