अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध लागल्याने माता गहिवरली

अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध लागल्याने माता गहिवरली

कोपरी परिसरात राहणाऱ्या एका महिलेची 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी बेपत्ता झालेल्या मुलीच्या आईसह कोपरी पोलीस ठाण्यात भेट देऊन हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कोपरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक दिपाली लंभाते यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत अपहृत मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप ताब्यात दिल्याने माता गहिवरली. तिने जाधव यांच्यासह कोपरी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अनिकेत उघाडे या तरुणाला अटक केली आहे.अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र आगरकर यांनी दिली.
ठाणे पुर्वेकडील शांतीनगर परिसरातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार 30 ऑगस्ट रोजी कोपरी पोलीस ठाण्यात दिली होती.या तक्रारीबाबत अविनाश जाधव यांनी पोलिसांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. दिपाली लंभाते यांच्या पथकाने 14 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हयातुन अपहृत मुलीचा शोध लावला.तसेच,अपहरण आणि अत्याचाराप्रकरणी त्याच परिसरात राहणाऱ्या अनिकेत उघाडे या तरुणाला अटक केली.पोलिसांच्या या कामगिरीची दखल घेत अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर आभार व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी एक महिला त्यांची 16 वर्षांची मुलगी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे अशी तक्रार घेऊन आल्या होत्या. तात्काळ त्यांना सोबत घेऊन कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांची भेट घेतली. कुठल्याही परिस्थितीत त्या मुलीचा शोध घ्या.अशी विनंती यावेळी पोलिसांना केली.पोलिसांनी तातडीने तपास करून अपहृत मुलीचा छडा लावल्याने या महिलेने आभार मानल्याचं जाधव यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading