ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करण्याची पालिकेची मोहिम सुरूच आहे. मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील जवळपास ३० स्टॉल्स, ३० बाक, ३७ ठेले, १५ हातगाड्या आणि ११ चायनीज गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईअंतर्गत मुंब्रा स्टेशन परिसर, आनंद कोळीवाडा, कौसा रोड या परिसरात ही कारवाई करण्यात आली. दोन सत्रामध्ये ही कारवाई करण्यात आली.