अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणा-या अधिकारी, कर्मचा-यांना त्रास देणा-या गृहसंकुलातील पदाधिकारी – सदस्यांवर कठोर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणा-या अधिकारी, कर्मचा-यांना त्रास देणा-या गृहसंकुलातील पदाधिकारी आणि सदस्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत. कोविड संसर्ग आता मोठ्या प्रमाणावर विस्तारत असून कोविडचा फैलाव रोखण्यासाठी प्रामुख्याने डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती, सफाई कर्मचारी, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. काही अधिकारी कर्मचा-यांना ते राहत असलेल्या गृहसंकुलातील पदाधिकारी आणि सदस्यांकडून संकुलातील सुविधांचा वापर करण्यास निर्बंध घातले जात असून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयात राहणारे डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी यांना गृहसंकुलातील सदस्यांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिका-यांना तशी लेखी समज देण्यात येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading