कोव्हीड-नॅान कोव्हीड ओपीडी वेगवेगळ्या ठेवाव्यात – पालिका आयुक्तांचे आदेश

कोविडचा प्रसार रोखण्यासाठी कोव्हीड-नॅान कोव्हीड ओपीडी वेगवेगळ्या ठेवाव्यात अशी नियमावली महापालिकेनं तयार केली आहे. कोविडची लक्षणे असलेल्या रूग्णांपासून नॅान कोव्हीड रूग्णांना कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी शहरातील विविध रूग्णालयांच्या बाह्य रूग्ण कक्षामध्ये कोणत्याही रूग्णांची तपासणी करण्याआधी त्या रूग्णाला कोरोना सदृष्य काही लक्षणे आहेत का याची तपासणी केल्यानंतरच बाह्य रूग्ण कक्षामध्ये त्यांची तपासणी करण्यात यावी. त्याचबरोबर कोव्हीड आणि नॅान कोव्हीड ओपीडी वेगवेगळ्या असाव्यात अशा प्रकारची नियमावली शहरातील सर्व रूग्णालयांना निर्गमित करण्यात आली. शहरामध्ये पालिकेची आरोग्य केंद्रे आणि काही खासगी हॅास्पीटल्समध्ये ताप बाह्य रूग्ण विभाग सुरू करण्यात आले आहेत. या बाह्य रूग्ण विभागामध्ये काम करणाऱ्या डॅाक्टर्स, नर्सेस किंवा इतर कर्मचाऱ्यांनी पीपीई किटस् वापरले नसल्यास त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर तपासणीसाठी येणाऱ्या नॅान कोव्हीड रूग्णांनाही त्याचा संसंर्ग होण्याची शक्यता असून रूग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र ट्रायज एरिया तयार करून त्या ठिकाणी त्याची प्राथमिक तपासणी करावी. बाह्य रूग्ण विभागामध्ये जे वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत त्यांनी पीपीई किट वापरणे बंधनकारक असून कोव्हीड ओपीडी आणि नॅान कोव्हीड ओपीडी पूर्णतः वेगवेगळी असायला हवी. जेणेकरून नॅान कोव्हीड ओपीडी मधील रूग्णांना कोव्हीड ओपीडीमध्ये येणाऱ्या रूग्णांकडून संसर्ग होणार नाही. रूग्णालय व्यवस्थापनाने कोव्हीडचा संसर्ग रोखण्यासाठी या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे असे आदेश पालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading