अडीच लाख ‍विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला स्वच्छ अमृत महोत्सव

स्वच्छ अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत शहरातील महापालिका शाळा आणि खाजगी शाळांमध्ये स्वच्छता तसंच टाकावुतून टिकाऊ कलाकृती या विषयावर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धत सर्व शाळांमधील अडीच लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे महापालिका आयुक्त विपिन शर्मा आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाला. तसेच ‘इंडियन स्वच्छता लीग’च्या धर्तीवर महापालिकेने प्रभाग समिती स्तरावर आयोजित केलेल्या ‘ठाणे स्वच्छता लीग’ ध्वज ठाणे महापालिकेतील सर्व प्रभाग समित्यांच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आला. इंडियन स्वच्छता लीग कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ अमृत महोत्सव ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा महोत्सव यशस्वी केला. विद्यार्थ्यांनी स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे या विषयावर कल्पकतेने रेखाटलेल्या चित्रांचे मान्यवर परीक्षकांच्या माध्यमातून परीक्षण करून विजेते जाहिर करण्यात आले. तसेच टाकाऊ वस्तू वापरून टिकाऊ प्रकल्प तयार करण्याच्या स्पर्धेतही विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निमित्ताने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत महापालिका शाळा गटात शाळा क्रमांक ४४ मधील सहावीतील दिशा वाकोडे, शाळा क्रमांक ७४मधील सातवीतील रबिया खान, शाळा क्रमांक ५२ मधील आठवीतील तनीषा सुतार, शाळा क्रमांक १३ मधील नववीतील फातिमा अन्सारी हे प्रथम क्रमांकांचे विजेते ठरले. तर खाजगी शाळांमध्ये एन्जल पॅरेडाईज स्कूलच्या सहावीतील पिंजरी मरीयम, यशोधन मराठी विद्यालयाची सातवीतील चेतना चव्हाण, श्री माँ बालनिकेतन मधील आठवीतील साहिल साबळे तर सेंट जॉन बाप्टीस्ट स्कूलची नववीतील श्रेया कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. टाकाऊतून टिकावू प्रकल्पासाठी विजेत्या ठरलेल्या खाजगी शाळा – इयत्ता 6 वी -गौतम विद्यामदिर, इयत्ता 7 वी एस.एम.जी विद्यामंदिर, इयत्ता 8 वी यू.एन.एस इंग्लीश स्कूल, इयत्ता 9 वी : एस.एम.जी विद्यालय तर महापालिका शाळांमध्ये इयत्ता 6 वी – शाळा क्र. 65, इयत्ता 7 वी- शाळा क्र. 44, इयत्ता 8 वी शाळा क्र. 44, इयत्ता 9 वी शाळा क्र. 8 विजेते ठरले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading