अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार आंदोलन

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आलं. अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. अजित पवार तुम्ही बोलता काय तुमचा घसरत चाललाय पाय, धर्मासाठी दिले प्राण-अजित पवारांना कसे कळणार अशा घोषणा लिहिलेले फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते. धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय जय जय जय भवानी जय जय जय जय जय शिवाजी, संभाजी जय बोलो शिवाजी जय बोलो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading