समतोल फौंडेशनतर्फे जिल्हा रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य भोजनाची सुविधा

जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांना आता मोफत भोजन मिळणार आहे. समतोल सेवा फौंडेशनतर्फे हे विनामूल्य जेवण दिलं जाणार आहे. समतोल सेवा फौंडेशनचे विश्वस्त हरिहरन सुब्रमण्यम् यांनी आपले वडील रामस्वामी सुब्रमण्यम् यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रूग्णालयात अन्नदान हा उपक्रम सुरू केला आहे. आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. जिल्हा सामान्य रूग्णालय हे गेली अनेक वर्ष शहरी तसंच ग्रामीण भागातील रूग्णांसाठी उपचार सेवा पुरवत आहे. या रूग्णालयात वाडा, मोखाडा, जव्हार, पालघर, कर्जत, कसारा अशा दुर्गम आणि ग्रामीण भागातून येणा-या रूग्णांची संख्या मोठी आहे. अशा रूग्णांचे नातेवाईक रूग्णालयाच्या परिसरातच राहतात. बिकट परिस्थितीमुळे उपचारासाठी आलेल्या नातेवाईकांना बाहेरचं जेवण घेणं शक्य होत नाही. अशा सर्व रूग्णांच्या नातेवाईकांसाठी संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान समतोल फौंडेशनच्या माध्यमातून मोफत पोषक आहार दिला जाणार आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: