विकास करताना कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, आगरी-कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आगरी कोळी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते कल्याणमध्ये आले असताना त्यांनी हे आश्वासन दिले. कोळीवाड्याची समस्या सोडवण्यासाठी मुंबईनंतर इतरत्रही कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी वेगळी विकास नियंत्रण नियमावली तयार केली जात आहे. आगरी समाजाने सातवाहन काळापासून स्वतःचा लढवय्ये पण सिद्ध केला आहे. महाराजांनी सुद्धा समुद्र वाचला तर संस्कृती वाचेल अशी दूरदृष्टी ठेवून आगरी कोळी समाजाच्या मदत किनारपट्टी संरक्षणाची व्यवस्था उभी केली होती. नवाळी येथील आंदोलनकर्त्यां मधील निष्पक्ष व्यक्तींवर अन्याय होऊ दिला जाणार नाही गुन्हे परत घेण्याबाबत निश्चित निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
