निविदा प्रक्रिया राबवून धूर आणि औषध फवारणी तात्काळ सुरू करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

शहरामध्ये डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण वाढत असल्यानं नव्यानं निविदा प्रक्रिया राबवून धूर आणि औषध फवारणी तात्काळ सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत येणा-या फायलेरिया विभागातील ठेकेदाराची मुदत संपली आहे. त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही. हा चांगला निर्णय असला तरी औषध फवारणी तात्काळ सुरू करावी अशी मागणी आमदार आव्हाड यांनी केली आहे. शहरामध्ये सध्या डेंग्यूचे साडेतीनशे रूग्ण आहेत. त्यामुळं जंतूनाशक औषधांची फवारणी बंद झाल्यास रोगराईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे म्हणून नव्यानं निविदा प्रक्रिया राबवून फायलेरिया विभागातील धूर आणि औषध फवारणी तात्काळ सुरू करावी अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: