शहराच्या विकासामध्ये ज्येष्ठांचं योगदान मोलाचं – महापौर

शहराच्या विकासामध्ये ज्येष्ठांचं योगदान मोलाचं आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा हा शहरासाठी होत असल्याचं प्रतिपादन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केलं. ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शहराच्या विकासासाठी भरीव योगदान देणा-या ज्येष्ठ नागरिकांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं सायली तळवलकर आणि श्रीरंग भावे यांच्या संगीतमय मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं. तळवलकर यांनी आपल्या शास्त्रीय गायनानं उपस्थितांची मनं जिंकली. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ला सुरूवात झाली असून याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शपथ घेतली. या कार्यक्रमाला शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading