राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानं राजकीय क्षेत्रातल्या जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांची ही भेट पाऊण तास चालली. मात्र या दोघांच्या भेटीमागचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होत असतानाच आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे समजले जाणा-या आव्हाड यांनी उध्दव ठाकरे यांची घेतलेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मात्र ही सदीच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे.
