crime

अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलास ८ दिवसांमध्ये पुन्हा आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात भिवंडीच्या गुन्हे शाखेला यश

भिवंडीमधून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलास ८ दिवसांमध्ये पुन्हा आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात भिवंडीच्या गुन्हे शाखेला यश आलं आहे. भिवंडीमधील धामणकर पूलाच्या खाली आईच्या कुशीमध्ये झोपलेल्या कुमार आशिक हरजन या बालकाचे ३ जूनला अपहरण करण्यात आले होते. हरजन यांच्या तक्रारीनंतर भिवंडी गुन्हे शाखा या मुलाच्या शोधात लागली. भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शीतल राऊत यांनी मिळालेल्या माहितीवरून वाहन चोरी करणारा रोहित कोटेकर याला अटक केली. त्याच्या चौकशीत त्यानं हा प्रकार त्याचा साथीदार सुरेश सोनी याच्या साथीनं कर्ज फेडण्याकरिता केल्याची कबुली दिली. अपहरण करण्यात आलेल्या कुमार आशिकला महाराज गंज या नेपाळ हद्दीला लागून असलेल्या गावात विक्री करण्यात आल्याचं सांगितलं. या माहितीवरून पोलीसांनी उत्तरप्रदेशातील एक सडवा तालुका जिल्हा महाराज गंज येथून त्याला ताब्यात घेतले आणि अपहरण झालेले बालक अवघ्या ८ दिवसात आई-वडीलांकडे सुपूर्द केले. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Comment here