अतिशय दुर्मिळ असलेले खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक

अतिशय दुर्मिळ असलेले खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा तस्करांना ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. देवजी सावंत,  संजय भोसले आणि रामदास पाटील अशी अटक आरोपींची नावे असून साकेत-बाळकुम रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिरासमोर या तस्कराकडून भलेमोठे जिवंत खवले मांजर हस्तगत करण्यात आले. 40 लाख रुपयांना हे खवले मांजर विकण्यासाठी आणल्याची कबुली त्रिकुटाने दिली असून खवले मांजराला वनविभागाच्या हवाली करण्यात आले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील साकेत-बाळकुम रस्त्यावरील पुलाजवळील महालक्ष्मी मंदिरासमोर काहीजण दुर्मिळ वन्यजीवांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईत तिघा तस्करांना 10 किलो वजनाच्या खवले मांजरासह अटक करण्यात आली. चौकशीत हे खवले मांजर 40 लाख रुपयात विकण्यासाठी आणले असल्याचे उघडकीस आले. कँसरसारख्या आजारावर औषध बनवण्यासाठी या सस्तन प्राण्याच्या खवल्यांचा वापर केला जातो. मात्र या तस्करांनी कुणासाठी या वन्यप्राण्याची तस्करी केली याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: