festival

उद्याच्या गुढीपाडव्यासाठी सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत गुढी उभारण्याचं आवाहन

चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्तानं उद्या सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत गुढी उभारावी असं आवाहन पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केलं आहे.

social

विश्वास सामाजिक संस्थेच्या मुलांनी तयार केलेल्या गुढ्यांना अमेरिकेतून मागणी

ठाण्यातील विश्वास सामाजिक संस्थेतर्फे यंदाही छोट्या गुढ्या तयार करण्यात आल्या आहेत. विश्वास सामाजिक संस्थेतर्फे गतिमंद मुलांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी शिक्षण दिलं जातं.

cultural

रंगरसिक परिवारातर्फे गांवदेवी मैदानात १८ हजार चौरस फूटाची भव्य सुलेखनीय रांगोळी

रंगरसिक परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाण्यात गांवदेवी मैदानात १८ हजार चौरस फूटाची भव्य सुलेखनीय रांगोळी साकारण्यात आली आहे.

political shivsena

कासारवडवली, वडाळा मेट्रो प्रकल्पाबरोबरच उड्डाणपूलाच्या कामास सुरूवात करण्याची प्रताप सरनाईक यांची मागणी

कासारवडवली, ओवळा आणि भाईंदरपाडा या उड्डाणपूलाचा सलग एकच प्रकल्प करून कासारवडवली, वडाळा मेट्रो प्रकल्पाबरोबरच उड्डाणपूलाच्या कामास सुरूवात करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

crime

सीडीआर प्रकरणात चित्रपट अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीच्या वकीलाला अटक

मोबाईल कंपन्यांमधील कॉल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआर बेकायदा पध्दतीनं काढून त्याची विक्री केल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी यांचा वकील रिझवान सिद्दिकी याला काल ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे.

political shivsena

टोलनाक्यावरील पिवळ्या पट्ट्यांना कायदेशीर रूप देण्यासाठी लवकरच अध्यादेश

टोलनाक्यावरील लांबच लांब रांगा आणि होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिवळ्या पट्ट्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता पिवळ्या पट्ट्यांना कायदेशीर स्वरूप देण्यासाठी अध्यादेश काढण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

collector

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत यंदा आत्तापर्यंत ९८७ कोटी ७० लाख रूपये कर्ज वाटप

जिल्ह्यानं यावर्षीही प्रधानमंत्री मुद्रा योजनेत समाधानकारक कामगिरी केली असून यंदा आत्तापर्यंत ९८७ कोटी ७० लाख रूपये कर्ज वाटप केलं आहे.

social

रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा – रिक्षामध्ये विसरलेला महागडा मोबाईल केला परत

रिक्षा चालकांच्या मुजोरपणाच्या बातम्या या नेहमीच येत असतात. पण मुजोर रिक्षा चालकांबरोबरच चांगले रिक्षा चालकही असतात मात्र त्याचं प्रत्यंतर सर्वांनाच येतं असं नाही. पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांना असाच एका चांगल्या रिक्षा चालकाचा अनुभव काल आला.