डोंबिवली एमआयडीसी स्फोट घटनेतील जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च सरकार करेल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगीतल. प्राथमिक माहिती नुसार बॉयलरचा स्फोट झाला होता. परिस्थितीचा आढावा घेतला आहे एक ते दीड तासात पूर्ण आग विझेल असे चित्र आहे. जखमींच्या मागे सरकार उभे राहील, त्यांचा उपचाराचा पूर्ण खर्च सरकार करेल हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. या घटनेच्या मागे नियमबाह्य काही झालं आहे का हे तपासण्याच्या स्पष्ट सूचना फायर ब्रिगेडच्या लोकांना देण्यात आल्या आहेत. दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल. डोंबिवलीत श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एका विषयावर काम करत होतो ते म्हणजे या केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करणे, त्यासाठी जागा मिळाली आहे पण आचारसंहितेमुळे जागावाटप झाले नाही, 4 तारीखनंतर होईल असं उदय सामंत यांनी सांगितलं.
You must be logged in to post a comment.