पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे यासाठी प्रत्येकाने प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे, प्लॅस्टिक टाळणेबाबत जनजागृती व्हावी यासाठी मोठ्या आकारमानाची Canopy हरित जनपत पाचपाखाडी येथे उभारण्यात आली, यामध्ये १०,०००: PET बॉटल्सची माळ बनवून झाडांना वेढण्यात जाले. जर तुम्ही प्लॅस्टिक सोडले नाही, तर प्लॅस्टिक तुम्हाला सोडणार नाही असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इंडियन स्वच्छता लीग हा स्वच्छता विषयक देशव्यापी कार्यक्रम हाती घेण्यात आला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ह्या पंधरवडयात स्वच्छता विषयक विविध कार्यक्रम ठाणे महापालिकेने हाती घेतले.२ आँक्टोबर गांधी जयंती निमित्त नागरिकामध्ये एकल वापराच्या प्लँस्टिकवर बंदी ( Single use plastic ban) बाबत जनजागृती करण्यात आली. या कामासाठी मोठ्या प्रमाणात स्वत्व ह्या संस्थेमधील कलावंत एकत्र आले, त्यांनी स्त्री मुक्ती संघटनेतील कचरा वेचक मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून कौशल्यपूर्ण काम करून घेतले. हा प्रकल्प स्वत्व संस्थेचे श्रीपाद भालेराव आणि आर्टीस्ट नितांत हिर्लेकर आणि त्यांची टिमने केले. यावेळी स्त्री मुक्ती संघटनेच्या मुलांचा, कलावंतांचा माजी महापौर नरेश म्हस्के साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.